परळी: गाडे पिंपळगावजवळील पर्यायी पूल वाहून गेल्याने वाहतूक बंद, अंबाजोगाईमार्गे प्रवास करण्याचे प्रशासनाचे आवाहन
Parli, Beed | Sep 25, 2024 परळी तालुक्यात जोरदार पाऊस पडतो आहे.या पावसात परळी- बीड मार्गावरील गाडे पिंपळगाव नजीक असलेला पर्यायी पूल बुधवार दि. 25 सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्या सुमारास वाहून गेला आहे.परिणामी वाहतुकीसाठी हा मार्ग पुन्हा एकदा बंद झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी अंबाजोगाई मार्गे प्रवास करावा. असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्याकडून करण्यात आल आहे. दरम्यान परळी बीड मार्गावर गाडे पिंपळगाव नजीक नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल बांधण्यात आला होता मात्र जोरदार पावस