शिरपूर: तालुक्यातील रुदावली रस्त्यावर एस.टी. बसची दुचाकीला धडक,दोघे जखमी
Shirpur, Dhule | Sep 15, 2025 तालुक्यातील शिरपूर– रुदावली रस्त्यावर 14 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिरपूर आगाराची भरधाव एस.टी. बस दुचाकीला धडक दिल्याने हा प्रकार घडला.या अपघातात रविंद्र वाघु मोरे वय 52 व दयाराम भिमाजी सोनवणे वय 58 दोघेही रा. रुदावली, ता. शिरपूर हे जखमी झाले असुन त्यांना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.याप्रकरणी पुढील कार्यवाही शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.