पुर्णा: सुकी शिवारात शेत आखाड्यावर वृद्धपती पत्नीला चाकूच्या धाकावर लुटले
पूर्णा तालुक्यातील सुकी शिवारात शेत आखाड्यावर वृद्ध पती-पत्नीला चाकूचा धाक दाखवत मोबाईल सोन्याचे दागिने असा एकूण 22 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 20 सप्टेंबरला सायंकाळी घडली होती या प्रकरणात उशिराने एक ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.