हिंगणा: शुभम नगर मध्ये खाटू श्याम बाबा जन्मोत्सव पडला पार आमदार समीर मेघे यांची प्रमुख उपस्थिती
Hingna, Nagpur | Nov 1, 2025 हिंगणा मतदार संघातील वानाडोंगरी राजीवनगर येथील शुभमनगर मध्ये "खाटू श्याम बाबा यांच्या जन्मोत्सव" कार्यक्रमात आमदार समीर मेघे यांनी उपस्थित राहून खाटू श्याम बाबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून वंदन केले. आनी कार्यक्रमाचे आयोजक श्री तेजराम कंकरायने व त्यांच्या सहकारी यांना कार्यक्रमाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आदर्श पटले, सचिन मेंडजोगे, राजा तिवारी, विरेंद्र यादव, सौ छायाताई कराटकर, संतोष कुमरे, जयसिंग पटले, बाला पोटे, अशोक खरवडे आदी प्रमुख उपस्थित होते.