नंदुरबार: जिल्हा रुग्णालयात विविध मागण्यासाठी परिचारीकांचे काम बंद आंदोलन सुरू
नंदुरबार जिल्हा रुग्णालय आज शुक्रवारी दुपारपासूनच परिचारिकांचे आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू झाले. नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील एकूण १५० परिचारिका या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. परिचारिकांच्या काम बंद आंदोलनामुळे जिल्हा रुग्णालयातील आरोग्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा पवित्रा परीचारीकांनी घेतला आहे.