धुळे: विद्यार्थी सुरक्षेसाठी स्वास्तिक चौकासह विविध ठिकाणी एसपी श्रीकांत धीवरेंची धडक कारवाई! 60 शालेय वाहनचालकांची कडक तपासणी
Dhule, Dhule | Nov 28, 2025 धुळे शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशाने धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. जे. आर. सिटी, सेंट अँथनी, कनोसा यांसारख्या शाळांबाहेर अचानक कारवाई करून ६० खासगी स्कूल व्हॅन व ऑटोची ‘ब्रेथ अॅनालायझर’द्वारे तपासणी झाली. वाहनचालकांना फिटनेस, वैध कागदपत्रे आणि वेगमर्यादा पाळण्याचे निर्देश देत नियमभंग आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा श्रीकांत धीवरे यांनी दिला.