पारनेर: जयंत पाटलांवर खालच्या पातळीवरील केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निंदनीय- खा.निलेश लंके
ज्येष्ठ नेते, प्रगल्भ व सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले आ. जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेली खालच्या पातळीवरील वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निंदनीय असल्याचे खा.निलेश लंके यांनी आज १९ सप्टेंबर रोजी दु.४ वा.म्हंटले आहे. अशा व्यक्तींच्या वक्तव्यांनी राजकारण खराब होत आहे. परंपरेने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही शिष्टाचार, आदर व विवेक यांच्या आधारावर उभी राहिलेली आहे. त्यात अशा वक्तव्यांना कधीही जागा नाही असे खा.लंके यांनी म्हंटले आहे.