संगमवाडी रस्त्यावर एक कार महिला चालवित होती. तिचे आणि एका इनोव्हा चालकाचा वाद झाला. कल्याणी नगरकडून येणाऱ्या चौकात इनोव्हा चालकाने गाडी आडवी लावली आणि महिलेची कार अडविण्याचा प्रयत्न केला. तो कार समोर थांबला असता महिलेने कार तशीच दामटली. अशा परिस्थितीमध्ये महिलेने त्याला किमान 2 KM फरपटत नेलं. त्यावेळी तो इनोव्हा चालका रस्त्यावर पडला. तो गंभीर जखमी झाला.