उमरखेड: सोईट येथे ओबीसीची चिंतन बैठक पडली पार ; १७ सप्टेंबर रोजी उमरखेड येथे ओबीसीचा एल्गार मोर्चा
ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्याही प्रकारची कुरघोडी न होता त्यांचे शैक्षणिक राजकीय आरक्षणाचे न्याय - हक्क अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील अनेक ठिकाणी सकल ओबीसी संघटन उमरखेडच्या वतीने संवाद दौरा सुरू असून आज रोजी ग्रामस्थांच्या वतीने ओबीसी समाजाची बैठक सोईट येथे आयोजित करण्यात आली होती.