मुखेड: शहरातील नाईक नगर येथील घरातून अज्ञात चोराने केला 48 हजार रुपयांचे मला लंपास; मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Mukhed, Nanded | Apr 18, 2024 17 एप्रिल रोजी 12 पासून ते पहाटे 5 वाजेच्या दरम्यान शहरातील नाईक नगर येथील घरातून कोणीतरी अज्ञात चोट्यांनी घरात प्रवेश करून कपाटाला असलेल्या चाबीने कपाट उघडून सोन्या-चांदीचे दागिने, चार मोबाईल असे एकूण 48 हजार रुपयांचा मला चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद सुखदेव श्रीहरी देवकर यांच्या तक्रारीनुसार मुखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 129 / 2024 कलम 380, 457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.