कळमेश्वर: शिवसेना कार्यालय कळमेश्वर येथे मोहपा येथील युवकांचा पक्षप्रवेश
शिवसेना कार्यालय कळमेश्वर येथे आज सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मोहपा येथील अनेक युवकांनी शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेनेचे रघुवंशी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते