कोरेगाव: सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचा वाढता धोका : ल्हासुर्णे, शिरढोण आणि मुगाव फाट्यांवर झेब्रा क्रॉसिंगची मागणी
सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील ल्हासुर्णे फाटा, शिरढोण फाटा व मुगाव फाटा या ठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू तर १५ पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे सदर ठिकाणी तातडीने झेब्रा क्रॉसिंग व वेग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विविध गावचे सरपंच राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी केली आहे. शिवसेना कोरेगाव तालुकाप्रमुख संजय काटकर, ल्हासुर्णे येथील माजी सरपंच प्रशांत संकपाळ, सरपंच संतोष चव्हाण यांनी माहिती दिली.