यवतमाळ: मुख्यमंत्री यांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण न होता त्यांची निराशा ; प्रा. पाठे
दिनांक २९ सप्टेंबर (सोमवार) रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अपेक्षा होती की मुख्यमंत्री ओला दुष्काळ जाहीर करणे आणि सरसकट कर्जमाफी याबाबत काही ठोस निर्णय घेतील.मात्र शेतकऱ्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले आणि अखेरीस शेतकऱ्यांची अपेक्षा पूर्ण न होता त्यांची निराशा झाली. असे शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते प्रा.पंढरी पाठे यांनी दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी अंदाजे 4 वाजता सांगितले.