गोंदिया: गंगाझरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 दि.16 सप्टेंबरला तहसीलदार शमशेरसिंग पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सोनू विनायक घरडे यांच्या अध्यक्षतेखाली पट्टेवाटप कार्यक्रम अंतर्गत शेत पांदन रस्ते मोकळे करणे,नवीन रस्त्याची नोंद घेणे व महसूल विभागाशी संबंधित विविध योजनांची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 आक्टोंबर या कालावधीत शासनाच्या विविध लोकपयोगी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी,गाव खेड्यातील लहान मोठे समस्यांचा कायमस्वरूपी तोडगा निघावा या उद्देशाने उपाययोजना तयार करून निर्णय घेण्यात आले.