यवतमाळ: जिल्ह्यातील गोवारी समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम निवासी शाळांत शिक्षणाची संधी अर्ज करण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विशेष मागास प्रवर्गातील “गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना” नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी इंग्रजी माध्यम निवासी शाळांची निवड करण्यात आलेली आहे.