बुलढाणा: कालचे गुलामांना माणूस बनवण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले!संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री
बाबासाहेब आंबेडकर हे घटनेचे शिल्पकार हाच एक ब्रीदवाक्य आपल्याला माहित आहे, परंतु बाबासाहेबांनी फक्त इतकाच नाही जगाच्या पाठीवरचा कोणताही विषय असो,त्याचा अभ्यास करून त्याच्यावर महत्वपूर्ण पुस्तके लिहिली,आज आम्ही जे सूटबूट मध्ये आहोत त्याचा कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहे,कालचे असलेले तुम्ही गुलामांना माणूस बनवण्याचे काम बाबासाहेब आंबेडकरांनी केले आहे,असे वक्तव्य राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बुलढाणा येथील गर्दे सभागृहात आयोजित नागरी सत्काराला उत्तर देताना केले आहे.