मानोरा येथील शासकीय विश्रामगृह येथे दि. 25 ऑक्टोबर रोजी तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक प्रदेश उपाध्यक्ष बलदेव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक संदर्भात सविस्तर चर्चा करून कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे सुतोवाच कॉंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमोल तरोडकर यांनी केले. यावेळी नवनियुक्त युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अक्षय राठोड यांचा कॉंग्रेस पदाधिकार्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.