नाथापूर येथे वीज पडून एकाचा मृत्यू
Beed, Beed | Oct 20, 2024 नाथापूर येथे वीज पडून एकाचा मृत्यू जोरदार पाऊस सुरु असताना, लिंबाच्या झाडाखाली आसरा घेत थांबलेल्या, शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. संतराम देवडकर असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सदरील घटना नाथापूर येथे शनिवार दि.19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 च्या दरम्यान घडली. नाथापूर येथील शेतकरी संतराम अण्णासाहेब देवडकर हे आपल्या शेतामध्ये कापूस वेचानिकरिता गेले असता अचानक विजांच्या गडगडाट होवून पावसाची सुरुवात झाली त्यामुळे त्यांनी लिंबाच्या झाडाचा असरा घेतला त्याच वेळी विजेचा मो