सावनेर तालुक्यात सध्या ११ के.व्ही. विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. पाटणसावंगी ते इटनगोटी मार्गावर विद्युत वाहिनी टाकण्याच्या नावाखाली ठेकेदारांकडून वन विभागाची कोणतीही रीतसर परवानगी न घेता रस्त्याच्या कडेची डेरेदार आणि जुनी झाडे अवैधपणे तोडण्यात आली आह