पो.स्टे. रामटेक येथे 5 सप्टेंबर 2024 रोजी कलम 137 (3), 143 भारतीय न्याय संहितां अन्वये दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन अपहृत मुलीचा शोध लावण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष नागपूर ग्रामीणच्या पथकाला यश आले आहे. सदर मुलीला मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबरला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले. ही माहिती मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबरला सायंकाळी 8.30 वाजता च्या दरम्यान प्रसिद्ध पत्रकातून देण्यात आली. रामटेक येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत.