राहुरी: शिवाजीराव कर्डिले राजकीय डावपेचात पक्के होते, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले हे राजकीय डावपेचाला पक्के होते. कोणता डाव कधी टाकायचा हे त्यांना चांगले माहीत होते. शिवाजीराव कर्डिले हे माझे फार पूर्वीचे मित्र होते असं म्हणत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिला. आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकेल त्याचवेळी कर्डिलेंना खरी श्रद्धांजली ठरेल असे देखील पालकमंत्री यांनी म्हटले आहे.आज बुधवारी सायंकाळी राहुरी शहरात एका कार्यक्रमात ते बोलत होते.