खंडाळा: खंबाटकी घाटात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक धिम्या गतीने
खंबाटकी घाटात रस्त्याच्या कामामुळे वाहतूक धिम्या गतीने सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात भैरवनाथ कॉर्नरवर मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत मधल्या लेनमध्ये डांबरीकरणाचे काम सुरु होते. इतर दोन लेन बंद ठेवण्यात आल्या असून एकच लेन सुरु ठेवली आहे. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे घाटात सातारा बाजूकडे येताना वाहतूक कोंडी होत होती, अशी माहिती वाहनधारकांनी दिली.