वणी: 4 जानेवारीला दुपारी 12 वा. शासकीय मैदान येथे भव्य शेतकरी महाएल्गार मेळाव्याचे
आयोजन,माजी मंत्री बच्चू कडू,यांचीउपस्थिती
वणी शहरात दि. 4 जानेवारी 2026 ला दुपारी 12 वाजता वणी येथील शासकीय मैदान येथे भव्य शेतकरी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यामुळे शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर थेट भूमिका मांडत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.