जालना: बदनापूरजवळ रस्त्याच्या कडेला नवजात बालिकेला टाकून दिल्याची धक्कादायक घटना; बाळाला रुग्णालयात केले दाखल
Jalna, Jalna | Nov 1, 2025 जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवरील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला एका नवजात स्त्री जातीच्या जिवंत अर्भकाला टाकून दिल्याची धक्कादायक घटना 1 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री उघडकीस आली. शनिवार दि. 1 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीसांनी त्या बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री एका इसमाने दायल 112 वर फोन करीत या घटनेची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ रात्र गस्त करणारे सफौ डोभाल आणि पोना वेलदोडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.