मावळ: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट; बस स्थानक व एसटी बसेसची केली पाहणी व प्रवाशांशी साधला संवाद
Mawal, Pune | Sep 15, 2025 राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया, आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.