चाळीसगाव: चाळीसगाव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई! मोटारसायकल चोरणारे त्रिकुट जेरबंद; ₹१,२४,०००/- चा मुद्देमाल जप्त
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. पोलिसांनी एका मोटारसायकलसह शेतकऱ्यांच्या ११ पाणबुडी इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक केली असून त्यांच्याकडून एकूण ₹१,२४,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.