राहुरी: बारागाव नांदूर परिसरात मुळा नदी पात्रात वाळू साठ्यावर मोठी कारवाई
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातील मुळा नदीपात्रात अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती पोलीसांना मिळताच पोलिसांनी छापा टाकून अज्ञात वाळू तस्करांनी उपसा केलेली तब्बल ३० ब्रास वाळू, ज्याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये आहे, असा मोठा साठा जप्त केला. याशिवाय वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात आलेला अंदाजे ४५ हजार रुपये किमतीचा चप्पू देखील जप्त करण्यात आला. आज रविवारी दुपारच्या दरम्यान कारवाई करण्यात आली