चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीत राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा अहेरी विधानसभेचा गड ढासळणार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
लोकसभा निवडणुकीत राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा अहेरी विधानसभेचा गड ढासळणार असल्याची प्रतिक्रिया शनिवारी ब्रम्हपुरी येथे वडेट्टीवार यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यमंत्री आत्राम यांचा अहेरी विधानसभेचा गड ढासळणार आहे, आत्राम यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावे, नाही तर राजकारण सोडावे. राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे एक लाचार नेते आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभव समोर दिसत असल्याने त्यांच्या पाया खालची वाळू आता सरकायला लागली आहे, असंही वडेट्टीवार म्हणाले