नगर परिषद यवतमाळ सार्वत्रिक निवडणूक-2025 मतदान यंत्रांचे सिलिंग दि. 28 व 29 ला; उमेदवार किंवा प्रतिनिधींना उपस्थित राहता येणार निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांची माहित यवतमाळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 28 व 29 नोव्हेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन येथे सकाळी 10 वा.पासून मतदान यंत्राचे सिलिंग करण्यात येणार आहे. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यादरम्यान उपस्थित राहू शकतात, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ देशपांडे यांनी केले