तळा: तळा:माजी केंद्रीय मंत्री आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते उद्या तळा शहराच्या दौऱ्यावर.
Tala, Raigad | Apr 21, 2024 माजी केंद्रीय मंत्री आणि इंडिया आघाडीचे रायगड लोकसभेचे उमेदवार अनंत गीते हे सोमवार दि.२२एप्रिल रोजी तळा शहराच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे तळा शहर प्रमुख नजीर पठाण यांनी रविवार दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता तळा शहरातील शिवसेना कार्यालयात दिली.याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडी प्रमुख लता मुंढे,विभाग प्रमुख भगवान शिंदे यांसह शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.