सावंतवाडी: आंबोली घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळून अपघात : गाडीचे नुकसान सुदैवाने चालक किरकोळ जखमी
ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळून अपघात घडला. सुदैवाने यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. नागपूर, माळा कॉलनी) असे त्याचे नाव आहे. हा अपघात आज रविवार १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता आंबोली घाटातील नानापाणी वळणावर घडली. दरम्यान या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.