सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहमारा येथील दिलेरसिंग ठाकूर वय तीस वर्ष या तरुणाला राहते घरी अंगणात सापाने दंश केला, त्याला दिनांक 16 डिसेंबर रोजी सकाळी उपचारासाठी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.