उदगीर शहरात फिर्यादीने आरोपीला दिलेले पैसे मागितले असता आरोपींने फिर्यादीस डोक्यात बिअरच्या बाटलीने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ५ डिसेंबर रोजी गोपाळ बार येथे फिर्यादी याने आरोपीला दिलेले उसने पैसे मागितले असता आरोपींनी संगनमत करून तुझे कशाचे पैसे असे म्हणून हातातील कड्याने व काचेच्या बिअरच्या बाटलीने मारुन जखमी केले