पाटोदा: मेंगडेवाडीचा कच्चा रस्ता पुरामुळे गेला वाहून; ग्रामस्थांचे अतोनात हाल
Patoda, Beed | Sep 28, 2025 पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत हद्दीतील मेंगडेवाडी गावाला अजूनही डांबरी रस्ता मिळालेला नाही. गावाकडे जाणारा कच्चा रस्ता रविवार दि 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता, मुसळधार पावसामुळे पूर्णपणे वाहून गेला असून रस्त्यावर पाणी साचले आहे.यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून दळणवळण करावे लागत आहे. दूध-दुभते विक्रीसाठी, शेतमाल वाहतुकीसाठी तसेच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी आणि रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत.गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग फक्त काही किलोमीटर अंतराव