आज दिनांक 7 मार्च 2026 रोजी ग्रामपंचायत, पाटणसावंगी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत तहसील कार्यालय सावनेर द्वारा 'महाराजस्व समाधान शिबिर' आयोजित करण्यात आले होते. महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्थर निकालात काढणे, तसेच महसुल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.