यवतमाळ: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ; राजकीय पक्ष प्रतिनिधींची 11 नोव्हेंबर रोजी महसूल भवनात होणार बैठक
नगरपरिषद नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे बैठक उद्या (11 नोव्हेंबर) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे l. मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या आदेशान्वये राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम – २०२५ जाहीर करण्यात आलेला आहे.