स्ट्रॉबेरी मध्ये असलेल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखे राहून भूक कमी लागते. स्ट्रॉबेरी हे फॅट फ्री आणि कमी कॅलरीयुक्त फळ आहे. वजन कमी करायचे असेल तर स्ट्रॉबेरी खाणे हे फायद्याचे असते स्ट्रॉबेरी मध्ये विटामिन सी उत्तम प्रमाणात आढळून येते त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. स्ट्रॉबेरीमुळे रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहायला मदत होते हृदयविकाराचा धोका कमी होतो. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहिला मदत होते. स्टोबेरी मध्ये असलेली अँटिऑक्सिडंट ऑक्सीडेटीव तणाव आणि जळजळ कमी करतात. स्ट्रॉबेरी चा ज्यूस म्हणूनही वापर करतात.