उमरेड: अड्याळवाले लेआउट येथून दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीला 24 तासात अटक पाच दुचाकी जप्त
Umred, Nagpur | Sep 17, 2025 17 सप्टेंबरला रात्री आठ वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार अचल लामसोंगे यांनी त्यांच्या घरासमोरून दुचाकी चोरी झाल्याची तक्रार उमरेड पोलीस ठाण्यात दाखल केली होती या प्रकरणी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून पोलिसांनी 16 सप्टेंबरला आरोपी साहिल बोबडे राहणार शिवापूर याला अटक केली. आरोपीकडून एकूण पाच दुचाकी किंमत एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने या दुचाकी विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्या होत्या.