धुळे: सोशल मीडियावर तलवारीसह 'स्टेटस' ठेवणे पडले महागात; अंबिकानगर परिसरातून तरुणाला अटक
Dhule, Dhule | Nov 8, 2025 धुळ्यात सोशल मीडियावर तलवार आणि गुप्ती दाखवून दहशत पसरवल्याप्रकरणी पोलिसांनी अंबिकानगर परिसरातील २० वर्षीय आवेश पठाणला अटक केली. त्याने इन्स्टाग्रामवर कुख्यात गुंड सत्तार मेंटलच्या समर्थनार्थ फोटो-व्हिडिओ पोस्ट केले होते. पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या पथकाने कारवाई करून त्याच्याकडून तलवार व मोबाईल जप्त केला. पोलिसांनी तरुणांना अशा पोस्टपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे.