वर्धा: वर्धा विभागातील सर्व डाकघरांमध्ये 4 ऑगस्टला व्यवहार राहणार बंद
Wardha, Wardha | Jul 28, 2025 वर्धा डाक विभागात 5 ऑगस्टपासून नवीन आयटी 2.0 अप्लिकेशन सुरू करण्यात येणार आहे. या प्रगत व डिजिटल प्लॅटफॉर्मकडे सुरळीत व सुरक्षित संक्रमण सुनिश्चित करण्यासाठी डेटा स्थलांतर, प्रणाली पडताळणी प्रक्रियेसाठी 4 ऑगस्ट 2025 रोजी वर्धा डाक विभागातील सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.