उदगीर: उदगीरात मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने न्यायधीश भूषण गवई यांच्यावरील चप्पल फेक प्रकरणाचा केला निषेध
Udgir, Latur | Oct 7, 2025 सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरू वकिलाने चप्पल फेकण्याचा प्रयत्न केला सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या हा प्रकार दहशतवादापेक्षा कमी नाही सदरील प्रकार देशाला जगात अपमानित करणारा असून भारतीय संविधान व लोकशाहीला घातक आहे .अशा नीच वृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर शासन करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक केली पाहिजे या मागणीचे निवेदन मानवाधिकार संरक्षण समितीच्या वतीने राष्ट्रपती यांना देण्यात आले.