पाथ्री: गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली, रामपुरी सह अन्य गावातील 578 नागरिकांचे स्थलांतर, सैन्य दलाची तुकडी दाखल
गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाथरी तालुक्यातील सोळा गावांचा संपर्क तुटला. नाथरा, रामपुरी निवळी आदी गावांना 23 सप्टेंबरला पुराच्या पाण्याचा वेढा पडला. 578 नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून भारतीय सैन्य दल तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी 23 सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता दिली.