वर्धा: मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा केळझर येथील सिद्धिविनायक मंदिरातून शुभारंभ
Wardha, Wardha | Sep 17, 2025 मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाचा शुभारंभ आज ता. 17 बुधवारला दुपारी 12.15 वाजता केळझर येथील सिद्धीविनायक गणपती मंदिरातून करण्यात आला. कार्यक्रमाला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देवानंद पानबुडे, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र चोपडे, प्रशासकिय अधिकारी सुनिल मुरारकर, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते.