राहुरी: शहरात पावसामुळे पडझड काही प्रमाणात नुकसान
सर्वत्र झालेल्या राहुरी शहरातील लोहार गल्लीत राजेंद्र फर्निचर या दुकानाची भिंत व छत आज रविवारी पहाटेच्या सुमारास कोसळले. दुकानात कोणीही नसल्याने सुदैवाने जीवित हानी टळली. मात्र दुकानातील सापाचे तसेच एका दुचाकीचे नुकसान झाले आहे.त्याचबरोबर पीपल्स बॅक शेजारी दायमा वाड्यात घराची भिंत कोसळून त्यामुळे घरातील सामानाचे नुकसान झाले. सुदैवाने घरात व आजूबाजूला कोणी नसल्याने जिवीतहानी टळली. मात्र आर्थिक नुकसान झाले.