जालना शहरातील महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाला मटन विक्रेत्यांनी शिवीगाळ करुन कोयता हाता घेऊन जिवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना घडली आहे. गुरुवार दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रमुख शामराव छबुराव कसबे यांनी जालना तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून दोन जनावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख शामराव कसबे हे अतिक्रमण काढत होते.