गोंदिया: कामठा येथे येथे अनोळखी व्यक्तीचा अकस्मात मृत्यू
Gondiya, Gondia | Sep 20, 2025 कामठा गावातील पाणीटाकीजवळ एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. ही घटना १९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. निर्मला रामेश्वर नागपुरे (५५) रा. वाॅर्ड क्रमांक ५, कामठा यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे ४० ते ४५ वर्षांचा अनोळखी व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून गावात वेडसर अवस्थेत फिरत होता. गावकऱ्यांनी त्याला आंघोळ घालून कपडेही दिले होते, मात्र तो वारंवार अंगावरील कपडे काढून टाकत असे. १९ सप्टेंबर रोजी सकाळ