घनसावंगी: खालापुरी-डोंगरवाडी परिसरात पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई :५ लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त
घनसावंगी तालुक्यातील खालापुरी-डोंगरवाडी परिसरात पोलिसांनी बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर कारवाई करत तब्बल पाच लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई तिर्थपुरी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली असून या प्रकरणी सखाराम साळुजी मुळीक (वय ४९, रा. डोंगरवाडी, खालापुरी, ता. घनसावंगी) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी खालापुरीझडोंगरवाडी येथील कॅनॉलवरील पुलाखाली नदीपात्रात पाराजी मळेकर यांच्या शेताजवळ बेकायदेशीरपणे वाळूची वाहतूक