तिरोडा नगर परिषदेच्या बहुप्रतिक्षित निवडणुकीचे निकाल, २१ डिसेंबर रोजी जाहीर झाले असून, भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार अशोक असाटी यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत २७६१ मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.