कळमनूरी: इसापूर धरणाचे पाच गेट उघडून 5202 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग पेनगंगा नदी पात्रात सुरू
ईसापुर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दि . 2 नोव्हेंबर रोजी सकाळपासून पाऊस सुरू असल्याने जयपुर बंधाऱ्यातून येणारा येवा वाढत असल्याने आज दि .2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 5 गेट द्वारे 10 सेंटीमीटर वरून उंची वाढून 30 सेंटिमीटरने पैनगंगा नदी पात्रात 5202 क्युसेक्स म्हणजे 147.300 क्यूमेक्स इतका विसर्ग पेनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याची माहिती ईसापुर धरण पूर नियंत्रण कक्षा कडून प्राप्त झाली आहे .