सावली: सिताराम पेठ येथे भीमा नावाच्या वाघाने गाय केली ठार
सीताराम पेठ येथे केशव मडावी यांच्या गाईवर आज दुपारच्या सुमारास ३:०० वाजता वाघाने हल्ला केला व गाय ठार केली. ही घटना सीताराम पेठ मधील बोटिंग एरिया येथील बीट क्रमांक ९५६ मध्ये घडली. हल्ला करणाऱ्या वाघाचे नाव ‘भीमा’ असे नोंदवले आहे. स्थानिक लोक व वनखात्याच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.